चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा आज आगमन सोहळा; वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणता?
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मुंबई परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळांच्या मूर्तीचे आगमन होत आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची सर्वांनाच आतुरता लागलेली असते. या सोहळ्याला दरवर्षी लाखो गणेश भक्तांची उपस्थिती असते. ढोल-ताश्याच्या गजरांमध्ये आणि भक्तांच्या जयघोषामध्ये हा सोहळा पार पडतो. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा आहे. याच पार्श्वभूमीवर आज दुपारपासून लालबाग परळ येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आगमन सोहळ्यानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता लालबाग परळ भागातील वाहतुकीत बदल केला आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं वाहतूक पोलिसांच आवाहन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
डॉ बी ए रोड वरील हंसराज राठोड चौक (बावला कंपाउंड जंक्शन) ते कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) रस्त्याच्या दोन्ही बाजू वाहतुकीसाठी बंद आहे. साने गुरुजी मार्ग कॉम्रेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन) ते संत जगनाडे महाराज चौक (गॅस कंपनी) दोन्ही बाजूंची वाहतूक बंद असणार आहे. तसेच ना. म. जोशी मार्ग गुलाबराव गणाचार्य चौक (चिंचपोकळी जंक्शन) ते गंगाराम तळेकर चौक (एस ब्रिज जंक्शन) दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे तर महादेव पालव मार्गा शिंगटे मास्टर चौक ते कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गर्दी लक्षात घेता वाहन चालकांनी लालबाग, परळ(डॉ. बी.ए. आंबेडकर रोडने) जाणे टाळावे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
यासोबतच बॅ. नाथ पै मार्ग, रफी अहमद किडवाई रोड, ना. म. जोशी मार्ग, साने गुरुजी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.